हातवारे करीत पैसे मागणे लाचखोरीचा पुरावा नाही | Session Court

हातवारे करीत पैसे मागणे लाचखोरीचा पुरावा नाही
Share Now

Last updated on August 1st, 2025 at 09:46 pm

मुंबई – पैसे मागण्यासाठी ‘हातवारे’ करणे (इशारा करणे) हा लाचखोरीचा पुरावा ठरू शकत नाही. हातवारे करण्यावरुन लाचेची मागणी सिद्ध होत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा सत्र न्यायालयाने दिला आहे. एफडीएमध्ये कार्यरत सरला खटावकर या अधिकारी महिलेने २ लाखांची लाच मागितल्याचा आरोप होता. मात्र याचा सबळ पुरावा नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केली.

विशेष सत्र न्यायाधीश ‘निखिल मेहता’ यांनी हा निर्णय दिला. नगर येथील डेअरीमधील दूध जप्त करण्यात आले आणि नंतर पुढील कारवाईची धमकी देऊन २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. फेब्रुवारी २०१३ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नगरच्या पारनेर तालुक्यातील किसान कावड यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या आधारे ११ मार्च २०१४ रोजी गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चेंबूर येथील हॉटेलमध्ये सापळा रचला होता आणि २ लाख रुपयांची लाच मागताना सरला खटावकरला रंगेहाथ पकडले होते. मात्र लाचखोरीचा सबळ पुरावा सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी सरला खटावकरची दहा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली.


Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *