सावंतवाडीतील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या; हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचे सरकारला निर्देश | BOMBAY HIGH COURT
उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज आयसीयू असल्याचा सरकारचा दावा मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी (sawantwadi) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने गंभीर दखल घेतली. सावंतवाडीतील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या, असे सक्त निर्देश खंडपीठाने राज्य सरकारमधील आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित असल्याचा दावा सरकारतर्फे…


