पोलीस भरतीत आरक्षण धोरणानुसारच नियुक्ती करा – राज्य सरकारला सक्त आदेश – POLICE BHARTI | TRIBUNAL STRICT ORDERS

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा निर्णय मुंबई, दि. २६ ऑगस्ट, २०२५ – पोलिस भरती (Police Bharti) अंतर्गत नियुक्तीबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पोलीस भरतीमध्ये आरक्षण धोरणावर आधारित नियमानुसारच नियुक्ती करण्यात यावी, असे सक्त आदेश मॅटने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. पोलिस भरती प्रक्रियेतील गोंधळाचा अनेक उमेदवारांना फटका बसतो. त्याची गंभीर दखल न्यायाधिकरणाने एका प्रकरणात घेतली…

प्रोबेशनवर असतानाही प्रसूती रजेचा हक्क | MAT

– मॅटचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. मुंबई – नोकरीत ‘प्रोबेशन’वर असतानाही प्रसूती रजा घेण्याचा महिला कर्मचाऱ्यांना हक्क आहे. ‘प्रोबेशन’ कालावधीत प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल देत मॅटने महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. २०१५ मध्ये सहाय्यक वनसंरक्षक पदावर कार्यरत महिलेला प्रोबेशन कालावधीत प्रसूती रजा नाकारण्यात आली होती. राज्य सरकारचा तो आदेश…

बनावट नोटा चलनात आणणे अर्थव्यवस्थेला गंभीर धोका | DELHI HIGH COURT

– दिल्ली हायकोर्टाने आरोपीला जामीन नाकारला बनावट नोटा चलनात आणणे हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांत बाधा येते, असा महत्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. बनावट नोटा तसेच अमेरिकन डॉलर्स भारतीय चलनात आणल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला. न्यायमूर्ती शालिंदर कौर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. यापूर्वी दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने…