न्यायालयीन उलट तपासणीचे कौशल्य | BOMBAY HIGH COURT

Share Now

Last updated on August 14th, 2025 at 06:35 pm

उलट तपासणी ही खटल्यातील एक अत्यंत महत्त्वाची अवस्था असते. या टप्प्यावर साक्षीदाराच्या साक्षची विश्वासार्हता, अचूकता आणि प्रामाणिकता यांची चाचणी घेतली जाते. ही प्रक्रिया म्हणजे विरोधी पक्षाने बोलावलेल्या साक्षीदाराला अशाप्रकारे प्रश्न विचारणे, ज्यामुळे प्रतिपरीक्षकाच्या पक्षाला पोषक तथ्ये समोर येतील किंवा साक्षीदाराच्या साक्षवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

उलट तपासणीची मूलभूत तत्त्वे

खटल्याच्या तथ्यांची सखोल माहिती
खटल्यातील प्रत्येक तपशीलाची सखोल समज वकीलाला असणे अत्यावश्यक आहे. त्यात घटनाक्रम, संबंधित पक्षकार तसेच घडलेल्या घटनांची मालिका यांचा समावेश आहे. या गोष्टींची समज असल्यास वकिलाला साक्षीदाराच्या साक्षमध्ये असलेल्या विसंगती स्पष्टपणे ओळखता येतात. 

साक्षीदाराच्या निवेदनांची समज
साक्षीदाराने दिलेली निवेदने, उदा. जबाब किंवा प्रतिज्ञापत्र, यांचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक असते. या विश्लेषणात त्यांच्या निवेदनातील कोणतेही फरक किंवा बदल ओळखणे महत्त्वाचे असते. साक्षीदार विशिष्ट प्रश्नांना काय उत्तर देऊ शकतो याचा अंदाज घेतल्यामुळे वकील प्रभावी आणि योजनाबद्ध पद्धतीने प्रश्न विचारू शकतो.

साक्षीदाराच्या उत्तराबाबत अंदाज

उलट तपासणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे साक्षीदार प्रश्नांना कसे उत्तर देईल, याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार योजना तयार करणे. पुढचे प्रश्न नेमके असावेत, विशिष्ट मुद्यांवर लक्ष केंद्रित करणारे असावेत आणि साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर हळूहळू प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असावेत. प्रश्नांची रचना तार्किक पद्धतीने असावी, जी महत्त्वाच्या मुद्यांकडे हळूहळू घेऊन जाते. लवचिकता खूप महत्त्वाची आहे. उलट तपासणी घेणाऱ्या वकिलांना अनपेक्षित उत्तरांना सामोरे जावे लागते आणि अशा वेळी उलट तपासणी घेणाऱ्या वकिलांनी साक्षीदाराकडून सत्य कसे बाहेर येईल, अशा पद्धतीने प्रश्न विचारणा करावी. जर साक्षीदार प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न करत असेल, तर उलट तपासणी घेणाऱ्या वकिलांनी दुसऱ्या दिशेने किंवा पर्यायी प्रश्न विचारून तोच मुद्दा पुन्हा मांडावा आणि आवश्यक ती माहिती मिळवावी.




Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *