मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती होणार | BOMBAY HIGH COURT
सुप्रीम कोर्टाच्या काॅलेजियमची शिफारस मुंबई, दि. २६ ऑगस्ट, २०२५ – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलेजियमने केली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचे मूळ न्यायालय झारखंड उच्च न्यायालय आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय कॉलेजियमची २५ ऑगस्ट रोजी बैठक झाली….


