चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगवारी टाळता येऊ शकते; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल | SUPREME COURT

पक्षकारांमध्ये तडजोड झाल्यानंतर शिक्षा कायम ठेवता येत नाही नवी दिल्ली, दि. ३ सप्टेंबर, २०२५ – चेक बाऊन्सच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तक्रारदाराशी तडजोड झाल्यास आरोपी व्यक्तीची तुरुंगवारी टाळता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एकदा पक्षकारांमध्ये तडजोड करारावर स्वाक्षरी झाली की ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स’ कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत शिक्षा कायम ठेवता येत नाही, असे न्यायालयाने…

हायकोर्टांना निकाल देण्यासाठी ३ महिन्यांची मुदत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय | SUPREME COURT

न्यायदानातील विलंब टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल नवी दिल्ली, दि. २८ ऑगस्ट, २०२५ – उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनेकदा निकाल महिनोमहिने राखून ठेवतात. संबंधित पक्षकारांना त्या विलंबाच्या परिणामांना सामोरे जावे लागते. याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. देशभरातील उच्च न्यायालयांना आता निकाल राखून ठेवल्यानंतर पुढील तीन महिन्यांत तो निकाल जाहीर करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही डेडलाईन आखून…

१३० वी घटनादुरुस्ती विधेयक : पारदर्शकतेकडे पाऊल की निर्दोष मानण्याच्या तत्त्वाला आव्हान? | CONSTITUTION

सोनाली हनुमंत कुडतरकर, सहाय्यक प्राध्यापिका.  लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवण्याचा मूलभूत अधिकार आहे. दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो, असे भारतीय न्यायव्यवस्थेने वारंवार अधोरेखित केले आहे. परंतु, गुन्हेगारी आरोप असलेले नेते सत्तेत राहावेत का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने १३० वी घटनादुरुस्ती विधेयक, २०२५ लोकसभेत मांडले आहे. या विधेयकानुसार जर…

ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण; २००७ च्या कायद्यातील कल्याणकारी तरतुदी | BOMBAY HIGH COURT

– दिलीप साटले, वकील, मुंबई उच्च न्यायालय ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या जीवनात दुर्लक्ष, आर्थिक असुरक्षितता, देखभालीचा अभाव आदी समस्या भेडसावतात. या अडचणी लक्षात घेत सरकारने वृद्धांना सन्मानाने, सुरक्षिततेने जगता यावे म्हणून पालक व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम, 2007 हा कायदा केला. या कायद्यानुसार मुलं व नातेवाईकांवर पालकांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित केली आहे. तक्रारींवर…

दुचाकी घसरणे हादेखील ‘अपघात’च; भरपाईबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय | BOMBAY HIGH COURT

महिलेच्या कुटुंबियांना ७.८२ लाखांची भरपाई मंजूर मुंबई, दि. २० ऑगस्ट, २०२५ – अपघातात जखमी वा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. भरपाईचा दावा करताना अपघातामध्ये दोन गाड्यांचा सहभाग असण्याची आवश्यकता नाही. अपघाताला दुसरे वाहन कारणीभूत असणे आवश्यक नाही. अचानक दुचाकी घसरणे हादेखील ‘अपघात’ ठरतो. अशा अपघातातील मृत व्यक्तीचे कुटुंबिय मोटार वाहन…

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत ‘या’ तक्रारींवर एफआयआर नोंदवण्यापूर्वी प्राथमिक चाैकशीची गरज नाही | MADRAS HIGH COURT

उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; विलंब टाळणे हाच कायदेशीर हेतू चेन्नई, दि. २७ जुलै २०२५- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ च्या तरतुदींनुसार, जर तक्रारीत कायद्याअंतर्गत दखलपात्र गुन्हा उघड झाल्यास एफआयआर नोंदवण्यापूर्वी कोणतीही प्राथमिक चौकशी करण्याची गरज नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. अॅट्राॅसिटीच्या तक्रारी तातडीने नोंदवून घेतल्या पाहिजेत. त्यात कुठलाही प्रक्रियात्मक अडथळा…

न्याय मिळवणे हा विशेषाधिकार नव्हे तर संवैधानिक अधिकार; मुंबई हायकोर्टाचे निरिक्षण | BOMBAY HIGH COURT

रिअल इस्टेटमधील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करा, ‘महारेरा’ला ताकीद मुंबई, दि. २६ जुूलै, २०२५ – न्याय मिळवणे हा विशेषाधिकार नाही तर एक संवैधानिक अधिकार आहे. प्रक्रियात्मक स्पष्टता, भौतिक सुलभता आणि तांत्रिक आधार हे त्या अधिकाराचे मुख्य घटक आहेत, असे महत्वपूर्ण निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने ‘मयुर देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार’ प्रकरणात नोंदवले. याचवेळी ‘महारेरा’ प्राधिकरणाला रिअल इस्टेटमधील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी…