सावंतवाडीतील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या; हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचे सरकारला निर्देश | BOMBAY HIGH COURT

उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज आयसीयू असल्याचा सरकारचा दावा मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी (sawantwadi) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने गंभीर दखल घेतली. सावंतवाडीतील आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या, असे सक्त निर्देश खंडपीठाने राज्य सरकारमधील आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित असल्याचा दावा सरकारतर्फे…

नातवाला ताब्यात ठेवण्याचा आजीला कायदेशीर अधिकार नाही; हायकोर्टाचा निर्णय | BOMBAY HIGH COURT

मुलाच्या ताब्याबाबत जैविक पालकांपेक्षा आजी-आजोबांना जास्त अधिकार नाही मुंबई, दि. ५ ऑगस्ट, २०२५ – आजी आणि नातवंडांमध्ये घट्ट भावनिक नाते असते. मात्र त्या नात्याच्या आधारे आजी नातवाला ताब्यात ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार सांगू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. आजी-आजोबांचे नातवाशी असलेले भावनिक नाते त्यांना नातवाला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने जैविक पालकांपेक्षा जास्त अधिकार देत नाही,…

पोलिसांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग होणार; सुप्रीम कोर्टाने उचलले मोठे पाऊल | SUPREME COURT

सुमोटो जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश पोलीस कर्मचारी अनेकदा तक्रारदाराशी चढ्या आवाजात बोलतात. वरिष्ठांनी सूचना केल्या असतानाही नम्र वागत नाहीत. पोलीस कोठडीत मारहाणीचे प्रकार घडतात. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले आहे. देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत न्यायालयाने आग्रही भूमिका घेतली आहे. पोलिसांचे संभाषण रेकॉर्डिंग करणारी उपकरणे आणि सीसीटीव्ही…

वकिल परिषदेच्या महाराष्ट्र सचिवपदी अ‍ॅड. पूजा डोंगरे यांची नियुक्ती | COUNCIL OF LAWYERS

नियुक्तीची अधिकृत घोषणा; विधी क्षेत्रातील कार्याचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या वकिल परिषदेच्या महाराष्ट्र सचिव म्हणून अ‍ॅड. पूजा अनंत डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक अ‍ॅड. अभिषेक मल्होत्रा यांनी अ‍ॅड. डोंगरे यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. तसेच नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. अ‍ॅड. डोंगरे यांच्यावर विधी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठवाडा विद्यापीठातून ‘एलएलएम’पर्यंत शिक्षण घेतलेल्या अ‍ॅड. पूजा डोंगरे…

वकिल नोंदणीसाठी हस्तांतरण शुल्क आकारणे ‘बेकायदेशीर’| BOMBAY HIGH COURT

मुंबई हायकोर्टाचा निर्णय; परराज्यातील वकिलांना मोठा दिलासा मुंबई, दि. २९ ऑगस्ट, २०२५ – परराज्यातील बार कौन्सिलमधून महाराष्ट्रात वकिल नोंदणी शिफ्ट करताना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून आकारण्यात येणारे हस्तांतरण शुल्क (ट्रान्स्फर फी) बेकायदेशीर आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारची शुल्क आकारणी १९६१ च्या वकिल कायद्याच्या कलम १८(१) चे थेट उल्लंघन आहे, असे…

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती होणार | BOMBAY HIGH COURT

सुप्रीम कोर्टाच्या काॅलेजियमची शिफारस मुंबई, दि. २६ ऑगस्ट, २०२५ – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या काॅलेजियमने केली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचे मूळ न्यायालय झारखंड उच्च न्यायालय आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय कॉलेजियमची २५ ऑगस्ट रोजी बैठक झाली….