पत्नीने पतीवर कुटुंबियांसोबतचे संबंध तोडण्यासाठी दबाव आणणे घटस्फोटाचा आधार – DIVORCE MATTER | BOMBAY HIGH COURT

Share Now

काही महिलांचे सासरच्या मंडळींशी खटके उडतात, मग त्या महिला पतीवर कुटुंबियांसोबतचे संबंध तोडण्यासाठी दबाव आणतात. अशाप्रकारे पतीवर सतत दबाव टाकून कुटुंबियांशी असलेले संबंध तोडण्यास भाग पाडणे हा छळ आहे. हा छळ पत्नीपासून घटस्फोट मिळवण्याचा एक आधार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

कामाच्या ठिकाणी पतीला त्याचे सहकारी आणि वरिष्ठांसमोर मारहाण करणे, वारंवार सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे, शिवीगाळ करणे ही पत्नीची कृत्ये देखील मानसिक छळ आहेत, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने महत्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली. या प्रकरणातील पत्नीने सातत्याने पतीवर दबाव आणला होता. तिला संयुक्त कुटुंबात राहायचे नाही, कुटुंबाची मालमत्ता विभागून घ्या आणि विधवा आई व घटस्फोटित बहिणीपासून वेगळे राहा, अशा मागण्या लावून धरत महिलेने पतीला त्रास देणे सुरु ठेवले होते. पत्नीची ही सर्व कृत्ये पतीचा केलेला छळ असून याआधारे पिडीत पतीला घटस्फोट मिळवता येतो, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.

पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वारंवार धमक्या देणे, पोलिस तक्रारी दाखल करणे हीदेखील क्रूरता आहे. या कृत्यांना सुद्धा घटस्फोटाचा आधार मानले जाते, असेही न्यायालयाने नमूद केले. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(आयए) अंतर्गत क्रूरतेच्या आधारावर पतीसोबतचा विवाह रद्द करण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिच्या अपीलावर द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली आणि पत्नीच्या कृत्यांचा विचार करुन तिचे अपील फेटाळून लावले.



शेजारी त्रास देत असेल तर काय करावे? नागरिकांचे अधिकार – भाग – १ | Neighbor Bothering? Part 1 – BOMBAY HIGH COURT


Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *